जीएंची कथा सुखापेक्षा दुःखाला, आशेपेक्षा निराशेला, जिंकण्यापेक्षा हरण्याला आणि जगण्यापेक्षा मरण्याला अधिक प्राधान्य देणारी आहे…
जीएंच्या कथासंग्रहांची नावं (‘निळासावळा’, ‘पारवा’, ‘हिरवे रावे’, ‘रक्तचंदन’, ‘रमलखुणा’, ‘काजळमाया’, ‘सांजशकुन’ इ.) जरी इंद्रधनुष्यातील सप्तरंगाप्रमाणे मोहक वाटत असली, तरी या सर्वच कथासंग्रहांतून त्यांनी दुःखाचाच पुरस्कार केलेला दिसून येतो. एखाददुसरी कथा सोडली, तर बहुतांश कथा दुःखाच्या, निराशेच्या, अपयशाच्या, दुभंगलेपणाच्या, असहाय्यतेच्या काळ्या, गूढ छायांनी वेढलेल्या दिसतात.......